*युवकांनो थांबा, वय वाढले,लग्न होत नाही,म्हनुण नैराश्येकडे न‌ जाता,चुकीचा निर्णय घेऊ नका*


 *युवकांनो थांबा, वय वाढले,लग्न होत नाही,म्हनुण   नैराश्येकडे न‌ जाता,चुकीचा निर्णय घेऊ नका*

==================

सौजन्य : *राम आखरे नागपूर*


मित्रांनो ज्या समाजा मध्ये तरूण

 युवक शिक्षित तो समाज शिक्षित, ज्या समाजात जास्त प्रमाणात तरूण युवक उद्योजक तो समाज  आर्थिक सक्षम, आणि म्हणूनच समाजातील तरुणांनी विशेष करून ग्रामीण भागातील तरुण युवकांनी गरजे नुसार आवश्यक ते शिक्षण हे तर पुर्ण केलेच पाहिजे, परंतु नुसते शिक्षण घेऊन आणि डीग्री प्राप्त करून काही उपयोग नाही.जिवणात वेळेत प्रगती करायची असल्यास एक तर‌ आपल्या शिक्षणाच्या जोरावर एखादी चांगली नौकरी मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि  चिकाटी असावी लागतेच. समजा नौकरीचे जमतच नाही.अशी परिस्थिती निर्माण झाल्यास,तर सोडुन द्या नोकरीचा नाद, पुन्हा आपल्या जिवणातील वेळ आणि संधी वाया न घालवता, आपल्या शक्ती आणि युक्ती प्रमाणे  आपल्या जवळ आहे त्या आर्थिक बजेट मध्ये एखादा छोटा मोठा धंदा, व्यवसायाला सुरुवात करावी. परंतु धदा व्यवसायासाठी सर्व प्रथम आवश्यकता आहे  ती आपल्या मनाची माणसिकता , चिकाटी,परिश्रम, सातत्य, थोडीफार रिस्क घेण्याची तयारी ठेवावीच लागते त्याच प्रमाणे आपला एकदा काय व्यवसाय सुरू झाला म्हणजे त्यांचे आपले एक व्हिजन ठेवून आणि नियोजन आखावे आणि त्या प्रमाणे आपली व्यावसायीक वाटचाल सुरू ठेवावी, आणि आपला व्यवसाय प्रगती पथावर न्यायचा असेल तर वेळचे मात्र काटेकोर नियोजन करने तितकेच आवश्यक आहे, एवढे मात्र निश्चित. व्यवसाय आपण कोणत्याही प्रकारचा करा.कोणत्याही प्रकारे रस्त्यावर जरी  वस्तु विकायला ठेवल्या तरी ग्राहक हा मीळतोच मीळतो,मात्र  कोणत्याही प्रकारचा धंदा/व्यवसाय करतांना आपल्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते,आणि आपला व्यवसाय करतांना स्वभाव थोडा बोलका पाहिजे,कारण जो बोलत नाही,त्याचे सोनं सुद्धा विकल्या जात नाही परंतु  जो बोलका असतो त्याचे बोंड सुद्धा  पटापट विकल्या जातात,  फक्त आपल्याला आपल्या व्यवसायावर पुर्णपणे विश्वास करावा लागतो, कोणत्याही धंद्याची  मात्र  लाज बाळगू नये. आपण आपल्या एखाद्या परिचीत, नातेवाईक, मित्र मंडळी यांचे परिचयाने व सहकार्य मागवून आपण आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या शहरात सुरवातीला चहाचा ठेला , पाणी पुरीचा ठेला,मुग पकोडे‌ भजे, पान टपरी, भाजी विक्री किंवा बारामाही चालणारे हात ठेल्यावरील चालणारे अशा अनेक

  छोट्या मोठ्या  धंद्याची आपण अगदी बिनधास्त सुरूवात करू  शकता. 

    आपण एखादा धंदा सुरू केला म्हणजे तो चालेल की नाही.? नाही चालला तर मग कसे होईल.? असा निगेटिव्ह विचार आपल्या मनात अजिबात आनु नका.कारण शहरांत  आपण चांगल्या प्याकिंग मध्ये कुंड्यातिल झाडासाठी काळी माती जरी विकायला ठेवली तरी विकल्या जाते,एवढे मात्र निश्चित, म्हणूनच आपण आपला छोटा मोठा धंदा बिनधास्त सुरू करा. आपणास उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या राज्यात बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, बाहेरच्या प्रदेशातील असे अनेक युवक शहरात येऊन एका खोलीत पाच पाच,दहा दहा जन‌ सुरूवातीला दाटीवाटीने राहुण  येथे आपल्या राज्यात धंदे करून रोज दैनंदिन  कमीतकमी पाचशे, हजार रुपये कमावतातच, आणि नंतर ‌

 काही दिवसांनी हेच बाहेरील युवक शहरात एखाद्या‌ ठिकाणी प्लाट घेतात, घर बांधतात, लग्न करतात आणि ऐटित राहुन मस्त पैकी शान शौकतने आणि मोठ्या मजेत आनंदमय आपले जिवन जगतात, ही आज रोजीची‌ आपल्या राज्यातील  वस्तुस्थिती आहे.

-

आणि एवढे करूनही कोणी मुलगी देतच  नाही. म्हणून  नाराजा न होता, ईतर समाजातील जर कुणी आपणास मुलगी देत असेल तर आपण बिनधास्त करा.मी असे केले तर समाज काय..? म्हणेल याची तर आपण अजिबात काळजी करू नका,अशा वेळेस मात्र समाज सुध्दा तुमच्या काही कामात पडणार नाही.हा निर्णय‌‌ तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे.एवढे मात्र निश्चित, आणि याची आता सुरूवात देखील झालेली आहे, सोनाळा ता.संग्रामपुर जि.बुलडाणा, येथील समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री जगन्नाथजी तिडके साहेब यांचे प्रेरणेने व आव्हानाने कुणबी समाजात‌ मुलींची संख्या फारच कमी असल्याने समाजातील मुलांना लग्नाचे वय होऊनही मुलगीच मिळेनासे झाले.आहे, आणि समाजातील मुलांच्या या संवेदनशील व गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रित करून मध्य प्रदेशातील आदिवासींच्या मुली सोबत सुद्धा  कुणबी समाजातील मुलें आता राजीखुशीने लग्न करण्यास तयार झालेली आहेत. तेव्हा समाजातील युवकांना आपण आता तसे बिना लग्नाचे राहिल्या पेक्षा समाज काय.? म्हणेल हा विचार डोक्यातुन काढून टाका आणि समाजाचे हे बंधन झुगारून बिनधास्तपणे* जो समाज आपणास मुलगी देईल त्यांचे सोबत आपले वैवाहिक संबंध प्रस्थापित करा.समाजात किंवा  ईतर समाजात एखादी विधवा मुलगी असेल तिला आपण स्विकारू शकता,लग्नच होत नाही, म्हनुण नैराश्येच्या वाटेकडे गेल्यापेक्षा सामाजिक सेवाभावी कार्याच्या माध्यमातून आपल्या गावातील काही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा, आणि आपल्या साठी अजुन एक पर्याय आहे,आणि तो म्हणजे  आपण सुद्धा आता समाजाचा विचार न‌ करता " जाती तोडा आणि नाती जोडा" याच अभियानाला आता आपल्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा,

*शब्दांकन संवाद*

*राम आखरे नागपूर*

*भ्रमणध्वनी ९३७२३३०८६९*

Comments

Popular posts from this blog

*एक अनोखा मालिक*